संगणक, आरोग्य व संगणक आरोग्य
संगणकावर काम करत असताना वेळ कसा जातो याचे भानच राहत नाही. अशा वेळी दीर्घकाळ कार्य केल्यामुळे काही शारीरिक व आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातील बहुतांश तक्रारींची जर योग्य वेळीच व पुरेशी दक्षता घेतली तर उद्भवणाऱ्या तक्रारी टाळता येऊ शकतात.
![]() |
| Use of computer and health |
आसन व्यवस्था -
(१) संगणकावर कार्य करत असताना खुर्ची व टेबल यांची उंची व अंतर यांचे योग्य प्रमाण असावे.
(२) खुर्चीवर बसल्यानंतर पाठीचा कणा सरळ रेषेत येईल असे बसावे.
(३) की-बोर्डचा वापर करताना पुढे झुकू नये.
(४) पाय समपातळीत जमिनीवर समोर ठेवावे.
(५) मजकूर टाईप करत असताना हाताची बोटे कमीतकमी कोनातून वाकवावीत.
(६) संगणकाचा पडदा किमान दोन फुट अंतरावर आणि थोडासा नजरेच्या खालच्या पातळीवर असावा.
(७) स्क्रीनवरील प्रकाशाची तीव्रता (Brightness) खोलीमधील प्रकाशाच्या तीव्रतेपेक्षा अधिक असावी. ज्यामुळे स्क्रीनवरील अक्षरे पाहताना डोळ्यांवर ताण पडणार नाही.
(८) स्क्रीनवर येणारे इतर प्रकाशस्त्रोत स्क्रीनच्या मागील बाजूस असावे. त्यामुळे परावर्तीत प्रकाशाचा अनिष्ट पिरणाम डोळ्यांवर होणार नाही.
(९) डोळ्यांना अधून मधून विश्रांती द्यावी.
![]() |
| How seat in front of Computer |
तांत्रिक दक्षता -
संगणकामध्ये अत्यंत उपयुक्त असलेली माहिती, विविध चित्ररूप खेळ या प्रकारच्या विविध गोष्टी साठवलेल्या असतात. असे मूल्यवान प्रोग्राम्स व साठवलेली माहिती दीर्घकाळ संगणकामध्ये संग्रहित राहणे आवश्यक असते. त्यामुळे त्याची काळजीपूर्वक हाताळणी करावी लागते अन्यथा संगणकामध्ये बिघाड निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच सीडी व फ्लॉपी यांची हाताळणी योग्य प्रकारे करावी.
संगणकाला यू.पी.एस. (Uninterrupted Power Supply) ने विद्यत पुरवठा करावा. यामुळे संगणकातील फाईलमधील बिघाड टाळता येतील. संगणकास विषाणूच्या बाधित होण्यापासून वाचवण्याकरीता विषाणू प्रतिबंधक प्रोग्रॅम असावे. वीजपुरवठ्यात अनावश्यक बदल झाल्यानंतरही संगणकाचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी व विदयुत धक्का (Electronic Shok) बसू नये यासाठी त्याचे व्यवस्थित भूसंपर्कीत (earthing) केलेले असावे. विदयुत पुरवठा चालू असताना संगणकातील अंतर्भागाची हाताळणी किंवा जोडणी करू नये.


0 Comments