How to change Background in Photoshop?
फोटोशॉपमध्ये फोटोची Background बदलणे.
नमस्कार Amol, इंग्लिश लेख खूप झाले. तुम्हीही बोअर झाला असाल ! पण आज तुमचा कंटाळा जाणार आहे . कारण आता Photoshop चे Intoduction खूप झाले. आजपासून Practical ला सुरुवात करुयात. आता तुमची खरी Photoshop expert कडे वाटचाल चालू होईल. आज आपण एखाद्या फोटोची background कशी बदलावी अथवा आपल्या फोटोमागे एखादे चित्र कसे लावावे ते शिकणार आहोत.
![]() |
| Changing Background in Photoshop step by step |
प्रथम काय करा www.amolsoftwares.com minimise करा आणि कॉम्पुटरवर फोटोशॉप चालू करा. आता ज्ञानामृत.कॉम उघडून एक-एक टीप वाचत फोटोशॉपवर तसे करत रहा. यामुळे लेखात नेमके काय सांगितले आहे ध्यानात येईल तर आता कामाला लागा. फोटोशॉप उघडला असेलच. प्रथम तुम्हाला ज्या फोटोची background बदलायची आहे तो फोटो फोटोशॉप मध्ये उघडावा लागेल. त्यासाठी file > open वर click करा. त्यानंतर एक नवीन window उघडेल . यामध्ये तुम्हाला ज्या फोटोची background बदलायची आहे तो फोटो select करा आणि open वर click करा. तुम्हाला ज्या फोटोची background बदलायची आहे तो आता फोटोशॉप मध्ये open झालेला असेल.
| How to change Background in Photoshop Step by Step. |
आता Lasso tool वर right click करा व polygonal Lasso tool निवडा. या tool च्या सहाय्याने आपण आपला फोटो कट करणार आहोत. आता या tool च्या सहाय्याने आपल्या फोटोची बाह्य कडा select करत चला. ज्या-ज्या ठिकाणी आपल्या फोटोची बाह्य कडा येते त्या-त्या ठिकाणी mouse ची left click करत selection करा (फोटो कट करा आता फोटो कट करत-करत फोटो cutting चे पहिले टोक व शेवटचे टोक एकमेकांना आणून जोडा. टोके एकमेकांना जोडल्यानंतर फोटो सभोवती खाली दाखवलेल्या फोटोप्रमाणे selection दिसेल.
| How to change Background in Photoshop Step by Step. |
आता आपण या फोटोला feather देणार आहोत. feather दिल्यामुळे आपण आपल्या फोटोचे केलेले cutting म्हणजेच बाह्य कडा smoth वाटतात (फोटो कट केला आहे हे ओळखत नाही). Feather देण्यासाठी Ctrl + Alt + D हा shortcut वापरा व ३ ते ५ यामधील एक feather द्या.
| How to change Background in Photoshop Step by Step. |
या नंतर layer pallet मध्ये जाऊन नवीन Layer घ्या. नवीन layer कशी घ्यावी हे खालील चित्रात दाखवले आहे.
| How to change Background in Photoshop Step by Step. |
.
आता जो कलर आपल्याला Background द्यावयाचा आहे तो निवडण्यासाठी foreground color वर click करा. आणि त्यातून तुम्हाला हवा असणारा कलर निवडा. यानंतर Gradient tool वर right click करून Paint Bucket Tool निवडा.
| How to change Background in Photoshop Step by Step. |
layer 1 select असल्याची खात्री करा. आणि फोटो वर जाऊन click करा. तुम्ही निवडलेला कलर तुमच्या फोटोच्या background ला लागू झालेला दिसेल. आता selection च्या रेषा घालविण्यासाठी Ctrl + D (Diselect) हा shortcut वापरा.
| How to change Background in Photoshop Step by Step. |
आता वेळ आहे ती तुमचा फोटो save करण्याची. त्यासाठी File > Save as याप्रमाणे जाऊन आपल्याला हव्या त्या ठिकाणी save करा.
आजचा लेख कसा वाटला नक्की खाली कमेंट करून कळवा. त्याचबरोबर या लेखामध्ये तुम्हाला येणाऱ्या शंकाही तुम्ही कमेंट द्वारे विचारू शकता. पुढच्या लेखात तुमच्या फोटोच्या background ला एखादा फोटो कसा घालावा हे शिकणार आहोत. same चं आहे. काही थोडे बदल आहेत ते करून आपण फोटोच्या background ला एखादा फोटो कसा घालावा हे शिकणार आहोत.

0 Comments