Learn Adobe Photoshop in Marathi Part 1
फोटोशॉप शिका मराठीतून (भाग-१)
नमस्कार मित्रांनो, Amol Softwares (https://www.amolsoftwares.com) आपल्याला संधी देत आहे फोटोशॉप (Adobe Photoshop) शिकण्याची !!!
![]() |
| Learn Adobe Photoshop in Marathi Part 1 (Zero to Hero) |
आणि तीही चक्क मराठीतून !!! गुगल वर “मराठी फोटोशॉप” (Learn Adobe Photoshop in Marathi) असं सर्च केलं कि, आपल्या लक्षात येतं कि मराठीतून फोटोशॉप शिकता यावा असं सकस,पूरक लेखन अद्यापही उपलब्ध नाही. फोटोशॉप (Photoshop) हे एक असे Software आहे कि जे फोटो editing व mixing साठी सर्वत्र वापरले जाते. आजच्या युगात Microsoft Office, Open Office हे जसं सर्वांसाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे फोटोशॉपही आता सर्वांसाठी आवश्यक बनला आहे. पूर्वी फोटोशॉप हे Software फक्त प्रोफेशनल फोटोग्राफर्स वापराचे. पण सध्या विद्यार्थ्यांसाठीही ते महत्वाचे ठरत आहे.
शाळा, कॉलेजमध्ये अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स सध्या करावे लागतात. त्यामध्ये अनेक ठिकाणी फोटोशॉप मदत करतो. कोट्यावधी blog’s सध्या चालू आहेत. त्या blogs साठी Baners बनवणे, हेडर बनवणे यासाठीही फोटोशॉप महत्वाचा आहे. त्याचबरोबर फेसबूक साठी Cover Page बनवणे. इतर अनेक सोशल Networking साईट साठी लागणारे Page Cover, Logos इ. बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोटोशॉप वापरला जातो.
वरील सर्व बाबींच विचार केल्यावर आपल्या लक्षात आले असेल की, फोटोशॉप (Photoshop) आपल्यासाठी किती महत्वाचा आहे.तसं फोटोशॉप (Photoshop) हे Software शिकण्यास थोडं कठीण आहे. पण ते जेव्हा आपण आपल्या मातृभाषेतून शिकू तेव्हा ते शिकण्यास कठीण असं काहीच वाटणार नाही.फोटोशॉप हे Software डिझायनिंगशी (Designing) संबंधित असल्याने हे शिकताना आपल्याला कंटाळा येणार नाही. त्याचबरोबर हे शिकताना ज्यावेळी एखादा चांगला Effect तुमच्याकडून दिला जाईल. त्यावेळी तर फोटोशॉप शिकण्याची मजा आणखीनच वाढेल.
फोटोशॉपची (Adobe Photoshop) अनेक Versions सध्या उपलब्ध आहेत. फोटोशॉप 7 (Adobe Photoshop 7) व फोटोशॉप CS6 (Adobe Photoshop CS6) हि दोन फोटोशॉपची versions stable,वापरायला सोपी, सर्वत्र वापरात असणारी आहेत. “Adobe Photoshop 7” किंवा “Adobe Photoshop CS6” असा गुगल सर्च केल्यास हे Software आपल्याला सहज उपलब्ध होईल. कोणतेही एक version download करा आणि install करा, कि तुम्ही फोटोशॉप शिकण्यास तयार झालात.मी फोटोशॉप वरती लेख लिहित राहीन ते नियमित वाचत चला. आणि Photoshop Expert बना. पुढच्याच लेखापासून आपण फोटोशॉप शिकण्यास सुरवात करत आहोत. तेव्हा फोटोशॉप Download करून तयारीत रहा.
माझे पुढचे लेख जर तुम्हाला थेट तुमच्या ईमेल inbox मध्ये हवे असतील तर खाली तुमचा ईमेल द्या नवीन लेखांचे updates मिळवा.

0 Comments