Learn Adobe Photoshop in Marathi Part 2
फोटोशॉप शिका मराठीतून (भाग-2)
आजच्या या लेखापासून आपण फोटोशॉप शिकण्यास सुरवात करू. प्रथमतः आपण फोटोशॉप ची बेसिक (Basics of Photoshop) मांडणी कशी आहे ते पाहू
![]() |
| Learn Adobe Photoshop in Marathi Part 2 (Zero to Hero) |
टायटल बार (Title bar/Menu bar) :- सर्वात वरच्या बाजूस असणाऱ्या निळ्या पट्टीस टायटल बार (Title bar/Menu bar) असे म्हणतात. जेव्हा आपण फोटोशॉप उघडतो तेव्हा फोटोशॉप चे जे कोणते व्हर्जिन (version) आहे त्याचे नाव या बार वर दिसते.
उदा :- Photoshop CS5 Extended
![]() |
| Learn Adobe Photoshop in Marathi Part 2 (Zero to Hero) |
याचबरोबर आपण जी image फाईल उघडू किंवा बनवू तिचेही नाव फोटोशॉप व्हर्जिन (version) च्या नावापुढे पडते.
उदा :- Photoshop CS5 Extended - [Image name.jpg @ 1000% ( Layer 1, RGB/8)]
वरील उदाहरणामध्ये "Photoshop CS5 Extended" हे फोटोशॉप चे जे कोणते व्हर्जिन (version) install आहे ते दाखवते.
"Image name" हे आपल्या फोटोचे नाव दर्शवते. ".jpg" हे आपल्या फोटोचे format दर्शवते. "@ 100%" हे आपला फोटो, फोटो size च्या किती टक्के दाखवला जात आहे हे दर्शवते.
"Layer 1" हे सिलेक्ट (select) असणाऱ्या लेयर चे नाव दर्शवते. तर "RGB" हे आपल्या फोटोच्या कलरचा मोड ( colour mode ) दर्शवते.
Bitmap, Grayscale, RGB Colour, CMYK Colour, आणि Lab Colour हे सर्व कलर मोड आहेत. घाबरू नका या सर्वांचा आपल्याला काही उपयोग नाही फक्त माहिती असावी म्हणून सांगितले ( आपल्याला photoshop expert बनायचं आहे म्हणून).या कलर मोड मधील RGB हा कलर मोड आपण आपल्या फोटोंसाठी वापरतो. जर आपल्याला फलक ( Banner ) करावयाचा असेल तर आपण RGB च्या ठिकाणी CMYK हा कलर मोड वापरतो.
"/8" हे बीट ( bit ) दाखवतात. यामध्ये आपणास 1-bit, 8-bit, 16-bit, 32-bit असे options उपलब्ध आहेत. पण याच्याकडेही दुर्लक्ष करा कारण आपण नियमित 8-bit च वापरणार आहोत.
मेन्यू बार ( Menu bar ) :- टायटल बारच्या खालोखाल असणाऱ्या पट्टीस मेन्यू बार म्हणतात. यामध्ये File, Edit, Image, Layer, Select, Filter, Analysis, View, Window, Help हे मेनू आहेत. या सर्व मेनूंची कामे वेगवेगळी आहेत. ती आपण प्रत्यक्ष उदाहरणामध्ये पुढील काही लेखांमध्ये पाहू.
ऑप्शन बार ( Option bar ) :- मेन्यू बारच्या खालोखाल असणाऱ्या पट्टीस ऑप्शन बार म्हणतात. या बारमध्ये टूलबार ( tollbar ) मध्ये select असणाऱ्या toll विषयी उपलब्ध असणारे इतर options येथे दाखवले जातात.
Palets :- टूलबारच्या बरोबर समोर असणाऱ्या रुंदाकार उभ्या पट्टीस palets असे म्हणतात. यामध्ये navigator, histogram, info असे options आहेत. याशिवाय सर्वात शेवटी उजव्या कोपऱ्यात layer palet असते . ती जर आपल्या photoshop मध्ये दिसत नसेल तर मेन्यू बार वरील Window हे बटन दाबा.त्यानंतर येणाऱ्या list मधून "Layers" वरती click करा म्हणजे layer palet दिसू लागेल.
टूलबार ( Tollbar ) :- ऑप्शन बारच्या खाली डाव्या बाजूला असणाऱ्या उभ्या पट्टीस टूलबार ( tollbar ) असे म्हणतात. हा टूलबार सर्वात महत्वाचा समजला जातो. यामधील निरनिराळ्या टूलची निरनिराळी कामे आहेत. त्यावर खास एक पुढचा लेख लिहिला जाईल किबहुना दोन लेख लिहावे लागतील.
वर्क एरिया ( work space/area ) :- वरील सर्व बार सोडून जी रिकामी जागा उरते तिला work space असेही म्हणतात. यामध्ये आपण काम करत असतो. आपला फोटो इथेच दिसत असतो.
आज इथेच थांबतो वाचत रहा सभासद व्हा ( subscriber ). पुढचा फोटोशॉप विषयीचा लेख हा संपूर्ण टूलबारची माहिती देणारा असेल.
तुमचा ईमेल देऊन सभासद व्हा


0 Comments