Search Bar

Learn Adobe Photoshop in Marathi Part 4 (Step by step)


Learn Adobe Photoshop in Marathi Part 4

फोटोशॉप शिका मराठीतून (भाग-4)

फोटोशॉप टूलबार - २

          फोटोशॉप शिका मराठीतून-3 या- लेखात आपण मार्की टूल (Marquee tool), मुव्ह टूल (Move tool), लास्सो टूल (Lasso tool), क्विक सिलेक्शन टूल (Quick Selection Tool), क्रॉप टूल (Crop tool), व स्लाईस टूल (Slice tool) या टूल्स विषयी माहिती पाहिली. मी असं समजतो कि, तुम्हाला वरील टूल्स समजले असतील ! अजूनही काही अडचण असल्यास मला जरूर विचारा. कमेंट मधून अथवा मेल करून तुम्ही शंका विचारू शकता. किंवा माझ्या लिखाणात काही तृटी राहत असतील तरीही निसंकोच सांगायला विसरू नका. आजच्या या लेखात आपण काही पुढच्या टूल्सची माहिती घेणार आहोत.


Learn Adobe Photoshop in Marathi Part 4 (Step by step)
Learn Adobe Photoshop in Marathi Part 4 (Step by step)

        
          आता आपण एक-एक टूल बघू -----------



०७). हिलिंग ब्रश टूल  (Healing brush tool ):-

          या टूल मध्ये चार Subtools चा समावेश आहे
          १. स्पॉट हेलिंग ब्रश टूल ( Spot healing brash tool) -
          २. हिलिंग ब्रश टूल (Healing brash tool) -
या दोन टूल्स चा वापर चित्रातील काही भाग पुसटसा पुसणे किंवा फोटोच्या चेहऱ्यावरील डाग, पुरळ इ. नाहीसे करण्यासाठी केला जातो. यामध्ये स्पॉट हेलिंग ब्रश टूल ला Selection ची गरज नसते. तर हिलिंग ब्रश टूल ला Alt कि पकडून व माउसच्या Right Click ने ज्या भागचा डाग नष्ट करायचा आहे त्याच्या जवळील डागविरहीत त्वचेचे Selection केले जाते व तो कलर डागाच्या ठिकाणी देऊन डाग घालवला जातो. 
          ३. Patch Tool -
या टूल द्वारे वरील क्रिया करता येते. फक्त हा टूल वापरून माउसची Right click पकडून ठेऊन Selection करावे लागते. व ते selection इतरत्र वापरता येते. म्हणजेच त्या Selection ने Patch करणे होय.

          ४. रेड आय टूल (Red Eye Tool) -
हा टूल नावाप्रमाणेच कार्य करतो. अनेकवेळा आपण फोटो काढल्यावर लक्षात येते किंवा कमी दर्जाच्या camera मधून रात्री फोटो काढल्यावर फोटो मधील व्यक्तीचे डोळे लाल झालेले असतात किंवा बुबुळावर White colour आलेला असतो. अशावेळी हे टूल उपयोगी पडते. फक्त इतकच करा- Red eye tool select करा. आणि माउसची Right click पकडून डोळ्यावरून किंवा डोळ्याच्या border वरून फिरवा. चित्रातील लाल डोळा आता नेहमीच्या डोळ्यासारखा झालेला दिसेल.

Toolbar for photoshop article-4
Toolbar for photoshop article-4


०८). क्लोन टूल (Clone tool) :-

         या टूल मध्ये दोन Subtools चा समावेश आहे .
         १. Clone Stamp Tool -
         २. Pattern Stamp Tool -
या टूल्सचा वापर Heling brush tool सारखाच आहे.  यामध्ये  Alt कि पकडून व माउसच्या Right Click ने ज्या भागचा डाग नष्ट करायचा आहे त्याच्या जवळील डागविरहीत त्वचेचे Selection केले जाते व तो कलर डागाच्या ठिकाणी देऊन डाग घालवला जातो. 



०९). इरेझर टूल (Eraser Tool) :-

         या टूल मध्ये तीन Subtools चा समावेश आहे .
         १.  Eraser Tool
         २.  Background Eraser Tool
         ३.  Magic Eraser Tool
या टूल्सचा वापर नावाप्रमाणेच इरेज करण्यास म्हणजे चित्र खोडण्यासाठी उपयोग होतो.
Eraser Tool खोडण्यासाठी वापरतात. Background Eraser Tool वापरून आपण फोटोची background खोडू शकतो. तर Magic Eraser Tool ने एकसारखा कलर असणारी, फोटोमधील ठिकाणे खोडता येतात.



१०). ब्लर टूल (Blur Tool) :-

        या टूल मध्ये तीन Subtools चा समावेश आहे .
        १. Blur Tool
        २. Sharpan Tool
        3. Smudge Tool
या टूल्सचा वापर प्रामुख्याने फोटोची ब्लर कमी (Blur remove) करण्यासाठी होतो.
यामधील Blur tool वापरात ठेवावे लागते. इतर दोन टूल्सचा आपणा  फारसा उपयोग करणार नाही आहोत.



११).  ब्रश टूल (Brush Tool) :-

        या टूल मध्ये तीन Subtools चा समावेश आहे .
        १. Brush Tool
        २. Pencil Toll
        ३. Colour Replacment Tool
Brush Tool चा वापर ब्रशने रंगवल्याप्रमाणे होतो. ज्या आकाराचा व ज्या रंगाचा ब्रश निवडाल त्याप्रमाणे पेंटिंग करू शकता.
Pencil Toll चा वापर काहीसा ब्रश टूल  प्रमाणेच आहे. यामध्ये आपणाला Pencil sizePencile colour बदलता येतो.
Colour Replacment Tool मध्ये आपण निवडलेला रंग इतर Background वर टाकता येतो व Background ची लयही बदलत नाही.

१२). हिस्टरी ब्रश टूल (History Brush Tool):-

        या टूलचा वापर  ब्रश टूलने केलेली क्रिया (मागील) दाखवण्यासाठी किंवा ब्रश टूल ने क्रिया पुसण्यासाठीही हा टूल वापरला जातो. या टूल कडे दुर्लक्ष केलत तरी चालेल.


१३). पेंट बकेट टूल (Pint bucket tool):-

        या टूल मध्ये दोन Subtools चा समावेश आहे .
         १. Pint bucket tool - या टूलचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी हवा तो रंग भरता येतो.
      २. Gradient tool - या टूलला Select केल्यानंतर Option bar मध्ये आपल्याला अनेक काही तयार स्वरूपातील Gradient (काही रंग एकत्र करून निर्माण केलेले Pattern) दिसतील. यांचाही वापर रंग देण्यासाठी होतो.



१४). डॉज टूल (Dodge tool) :-

          या टूल मध्ये तीन Subtools चा समावेश आहे .
          १. Dodge tool
          २. Burn tool
          ३. Sponge tool
हे टूल कधीतरीच उपयोगात येतात. प्रत्यक्षात उदाहरणे बघताना याचा आपण अधिक अभ्यास करू.

तुमचा ईमेल देऊन सभासद व्हा!


Enter your email address:


Delivered by FeedBurner

Post a Comment

0 Comments